१२ ऑगस्ट पासून भोजला येथील अशोक राऊत माजी पंचायत समिती सदस्य यांचा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा प्रशासनाला इशारा!

पुसद: तालुक्यातील मौजे भोजला येथील जि. प. के. प्राथमिक शाळेच्या नावाने असलेली शेत सर्वे नं. ११८ क्षेत्र ०.८१ आर शेतजमीन ही एक वर्षासाठी लिलाव पद्धतीने घेऊन सुद्धा सामाजिक कार्यकर्ते तथा माझी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत यांना आजपर्यंत सबंधित शाळा समिती, मुख्याध्यापकांनी व गटशिक्षणाधिकारी तसेच सबंधित प्रशासनाने ताबा न दिल्याने तक्रार कर्त्यानां मोठा फटका बसला असून त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे या तक्रारकर्त्याने संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे संबंधित गटविकास अधिकारी शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक व शाळा समितीवर ७ दिवसाच्या आत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून कारवाई न केल्यास दि,१२ ऑगस्ट २०२५ पासून पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद तालुक्यातील मौजे भोजला येथील रहिवासी असलेले अशोक विठ्ठलराव राऊत सामाजिक कार्यकर्ता व माजी पंचायत समिती सदस्य यांनी मौजे भोजला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावाने असलेली शेत सर्वे नं. ११८ क्षेत्र ०.८१ आर शेतजमीन ही सन २०२५-२६ या एका वर्षाकरीता शाळा समिती व मुख्याध्यापक यांच्याकडून वहीतीकरीता या एक वर्षासाठी मी लीलाव पद्धतीने घेतली होती तसेच संबंधित विभागाकडे लिलाव पद्धतीने बोलीची रक्कम सुद्धा भरण्यात आली होती. परंतु संबंधित विभागाने आजपर्यंत ही जमीन माझ्या ताब्यात दिली नसून मी संबंधित विभागाकडे व आपणाकडे वारंवार लेखी तक्रारी सुद्धा केल्या आहेत. त्यावर तहसीलदार पुसद, जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी सुद्धा आपणाकडे कोर्टाचा आदेश असुन सुद्धा त्या आदेशाचा अनादर करीत आहात. तरी कोर्टाटच्या आदेशाने व संबंधिताकडे पत्र व्यवहार केला मात्र संबंधित मुख्याध्यापकांनी व शाळा समितीने याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आदेशाची अहवेलना केली आहे त्यामुळे तक्रारकर्त्याच्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागल्यायाने तक्रारकर्त्याचे या वर्षी लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. तक्रारकर्त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीच्या भरोशावरच असल्यामुळे तक्रारकर्त्यांने ही जमीन पदरमोडची रक्कम गुंतवून लिलाव पद्धतीने बोलीत भाग घेतला होता.त्यामुळे तक्रारकर्त्यानी इतर कुठेही शेती केली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे उपोषणकर्त्याच्या अर्जाचा सहानुभूती विचार करून सबंधित शाळा समिती व मुख्याध्यापक तसेच गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी सरपंच सचिव यांच्यावर तात्काळ सात दिवसाच्या आत फौजदारी गुन्हे दाखल करून तक्रारकर्त्न्यायाना न्याय द्यावा व सदर जमीन ही तक्रार कर्त्याच्या ताब्यात द्यावी अन्यथा तक्रारकर्ते दि.१२ ऑगस्ट २०२५ रोजी पुसद पंचायत समिती कार्यालय समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे