ईतर

खंडाळा पो.स्टे.हद्दीत एका इसमांवर जिवेघेणा हल्ला करणा-या अज्ञात आरोपींचे नाव २४ तासाच्या आत निष्पन्न आरोपीस अटक; स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई!

पुसद : तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेंबाळपिंपरी बस स्टॅन्ड जवळ दि.११मार्च २०२५ रोजी एका इसमांवर दोन अज्ञात इसमांने चाकूने मानेवर वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून अज्ञात आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन खंडाळा येथे अप क्रमांक ८४/२०२५ कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२), (३), ३(५) भान्यासं प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे नाव निष्पन्न करुन आरोपी शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून आरोपी निष्पन्न करुन अटक करणे बाबत सुचना दिल्या होत्या त्यानुसार सदर गुन्हयाच्या अनुषंगाने सदर पथकांने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषन व गोपनिय माहीती यांच्या आधारे सदरचा गुन्हा आरोपी नामे विशाल भिमराव जारंडे रा.मुखरे बोरी (खु) ता. पुसद जि. यवतमाळ व त्याचा आतेभाऊ राजेश ऊर्फ राजू गणेश पाटे रा. वाकोडी येडोंबा ता. कळमनुरी जि. हिंगोली यांनी मिळून केल्याचे निष्पन्न करुन शेंबाळपिंपरी परिसर, कळमनुरी परिसर व पुसद परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांने त्याचा शोध घेतला असता आज रोजी आरोपी विशाल भिमराव जारंडे रा. मुखरे बोरी (खु) ता. पुसद जि. यवतमाळ हा कोपरा फाटा येथे दबा धरुन बसला असल्याबाबत गोपनिय माहीती मिळाल्याने तात्काळ कोपरा फाटा येथे जावून सापळा रचून पोलीस कौशल्याचा वापर करुन त्यास ताब्यात घेवून पोलीस कौशल्यपुर्णरितीने गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने दारु पिण्याचे वादावरुन सदरचा गुन्हा त्याचा साथीदार आतेभाऊ राजेश ऊर्फ राजू गणेश पाटे रा. वाकोडी येडोंबा ता. कळमनुरी जि. हिंगोली यांचेसह केल्याचे कबूल केले असा प्रकारे कोणताही पुरावा नसतांना अतिशय शिताफिने पोलीस कौशल्याचा वापर करुन सातत्याने आरोपीचा मागोवा घेवून २४तासाच्या आत आरोपीचे नाव निष्पन्न करुन आरोपी १) विशाल भिमराव जारंडे वय ३० वर्ष रा.मुखरे बोरी (खु) ता. पुसद जि. यवतमाळ यास ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री.पियुष जगताप सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक श्री.हर्षवर्धन बी.जे.सा. मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close