ईतर

विदर्भ – मराठवाड्याला जोडणाऱ्या महत्वाच्या राज्यमार्गाकडे पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष;बेलोरा ते पांढुर्णा केदरलिंग राज्यमार्गावरील जीर्ण झालेला पुल गेला खचून!

पुसद: तालुक्यातील मारवाडी, बेलोरा, पांढुर्णा केदरालिंग वरून जाणारा महत्वाचा राज्यमार्ग २१४ क्रमांक असून विदर्भ – मराठवाडयाल्या जोडनारा रस्ता आहे. मागील दोन दिवस पासून झालेल्या पावसाने रस्त्यावरील चिखलाचे साम्राज्य चिखलातुन चालतांना वाहन चालकाना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत

करावी लागते दिलीप मारकड यांच्या शेता जवळील जीर्ण झालेला पुल खचून गेल्यामुळे अर्धा रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे..दहा महिने पूर्वी याच पुलाची डागडुजीचे काम बांधकाम विभागा मार्फत करण्यात आले होते, पावसाळ्याच्या पहिल्याच पावसात जीर्ण झालेला पुल खचून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे पितळ उघडे पाडले.पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने राज्यमार्ग क्रमांक २१४ वरील बेलोरा ते पांढुर्णा केदरालींग मार्गावरील मराठवाड्याला जोडणारा महत्वाचा रस्ता असून पावसाळ्यात कधीही हा पुल पूर्णपणे खचून वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. वारंवार रस्ता पुल खचून रस्ता उखडून जात आहे. अशा प्रकारामुळे एखादी दुर्घटना घडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकामाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उंटावरुन हाकतात घोडे!

बेलोरा येथील महादेव मंदिर जवळ वळणावर च्या रस्त्यावर पाणी साचत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करून रस्ता खोदून पाइप टाकून देऊ असे आश्वासन दिले होते त्या गोष्टीला दहा महिने होऊन गेले. पाच सहा महिने पूर्वी पाईप रस्त्याच्या कडेला येऊन पडले आहेत पण प्रत्येक्षात पावसाने तालुक्यात धुवांधार हजेरी लावल्याने व रस्ता खोदून पाईप टाकण्यात आलेले नाही…त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालेले आहे..सार्वजनिक बांधकाम विभागाने जातीने लक्ष देऊन पुलाचे नव्याने काम करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close