पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत दोन गुन्हेगारांवर स्थानबध्दची कारवाई!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या दोनजणां विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने एम. पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि५ सप्टेंबर२०२५ रोजी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अवैद्य दारू विकी करणारे आरोपी नामे क. (१) राजु भोजु पवार वय ४२ वर्ष, क. (२) सुधाकर धर्मा चव्हाण, वय ५२ वर्ष दोन्ही रा. कारला, ता. पुसद, जि. यवतमाळ या दोन्ही आरोपींवर अवैद्य दारू विकी संबंधाने दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले असतांना सुध्दा नमुद आरोपींतांचे वर्तणात कोणताही फरक पडत नसल्याने त्यांचेविरूध्द उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पुसद कडुन एम.पी.डी.ए. प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव मंजूर होणे करीता मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना पाठविण्यात आला. मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी सदर प्रस्ताव मंजूर केल्याने नमुद दोन्ही आरोपीना मध्यवर्ती कारागृह, अकोला येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.पुसद पोलीस उपविभागामध्ये कुणीही गुन्हेगारी कृत्याकडे वळु नये, गुन्हेगारीपासुन मुक्त राहावे, कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये. कुणीही अवैद्य दारू विक्री, मटका जुगार, पत्ता जुगार असे गुन्हे वारंवार घडत असल्याचे आमचे निदर्शनास आल्यास त्याचेवर कडक कायदेशीर कार्यवाही जसे; मोक्का, एम.पी.डी.ए. तडीपार, या व ईतर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल असे जाहिर आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.