माळ पठारावरील त्या गोळीबार प्रकरणातील फिर्यादीच निघाला आरोपी ;खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद: तालुक्यातील पठारावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या फेट्रा तेथील काहीजण शिकारीसाठी जवळच्या परिसरातील जंगलात गेले असतांना दि. १४ जूनच्या मध्यरात्री १२:०० ते १:०० वाजण्याच्या सुमारास बारा बारा बोर बंदुकीने शिकारीवर नेम धरत असतांना गोळीचा नेम चुकून सोबतच्या साठी दारात लागला या गोळीबार थरारात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती जखमीला यवतमाळ येथे उपचार करता दाखल करण्यात आले होते त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. खंडाळा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेट्रा येथील श्याम अनिल कुरडे व बाळू पांडुरंग कुरुडे हे काका पुतणे यांनी जंगल परिसरात शिकारीसाठी बारा बोअरची मोठी बंदूक घेऊन गेले होते. अंधारामध्ये शिकार दिसताच आरोपीने बंदुकीतून फायर केले चुकून पुतण्या श्याम अरुण कुरडे याला सदरील बंदुकीतून सुटलेले छर्रे पाठीत व पोटात घुसल्यामुळे तो गंभीर जखमी होऊन कोसळला काका या घटनेला घाबरून बनाव निर्माण केला की अज्ञात मारेकऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला. खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांना प्रथम फिर्याद जखमीचा काका बाळू पांडुरंग कुरुडे यांनी दिली. जखमीला तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या संदर्भात खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये जखमी शाम कुरडे चा भाऊ करण अनिल कुरडे याने दि. १५ जून रोजी फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या रिपोर्ट वरून खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये अ क्र२५९/२०२३ कलम ३०८ भादवी सहकलम ३/२५आर्मएक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर खंडाळा पोलिसांनी आरोपीस विद्यमान न्यायालयात दि. १६ जून रोजी हजर केले असता न्यायालयाने १९ जून पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिल्याची माहिती खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी दिली. परंतु ही घटना शिकारीच्या प्रकरणातून घडली तरीही वन विभाग मात्र झोपेचे सोंग घेत आहे हे बाब विशेष आहे.