क्राइम

पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ९ किलो गांजा जप्त!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत महागाव तालुक्यातील घोंसारा ते हिवळणीकडे जाणाऱ्या जंगलातील परिसरात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याची विचारपूस पुसद ग्रामीण पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडून९ किलो २६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून सुनील दादाराव आगोशे (वय २९, रा. हिवळणी ता. महागाव जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम ८(क), २०(ब) (ii) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, पुसद ग्रामिण पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध्य धंदे सुरू राहणार नाही. व अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पो. स्टे. गुन्हा नंबर १०१/२०२६ कलम ८(क),२०(ब)i(अ) एन.डी.पी. एस. ॲक्ट मधील आरोपी सुनिल दादाराव आगोसे रा. हिवळणी ता. महागाव यास गांजा आमली पदार्थ कोठुन आणले याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केले असता त्याने सांगितले की, सदर गांजा हा मी अर्जुन रामभाऊ बरगे रा. घोन्सरा ता. महागाव यांचे कडुन घेतला असुन त्याचेकडे अजुन गांजा आहे. त्यावरून अर्जुन रामभाऊ बरगे यास ताब्यात घेवून विश्वासात घेवून गांजा बाबत विचारपुस केली असता त्याने गांज्याचे पोते घोन्सरा ते हिवळणी जाणा-या जंगलात ठेवल्याचे कथन केल्याने ईसम नामे अर्जुन बरगे याने पंचासमक्ष काढून दिले. त्याची पाहणी केली असता एका नायलॉन पोत्यात निव्वळ गांजा ९ किलो २६० ग्रॅम की. १,८५, २०० रु.चा माल मिळून आल्याने तो जप्ती पंचनाम्याप्रमाणे पंचासमक्ष जप्त करून एन.डी.पि.एस. ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता सा.मा. अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात सा. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद बि. जे. हर्षवर्धन सा., मा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ श्री. सतीश चवरे यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत, पोउपनि पुंडलिक वानखेडे, पोहेको/ रविंद्र गावंडे, प्रेम आडे, नितीन आडे, पोअं. योगेश आळणे, अक्षय मोटे, नेमणुक पो. स्टे. पुसद ग्रामिण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close