विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांचा बाप्पाला भावनिक निरोप… मानवी साखळी द्वारे साकारले बाप्पा

पुसद : विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त सहभागावर आधारित असलेला अनोखा अभ्यासक्रम आणि विविध प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी विद्यालन्कार्स पोदार लर्न स्कूल पुसद अल्पावधीतच नावलौकिकास आली आहे. विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे सातत्याने लक्ष दिले जाते. त्यातीलच एक भाग अनंत चतुर्दशीचे औचित्य साधून विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलमध्ये सुमारे २०० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांची आकृती तयार करत मानवसाखळी निर्माण केली. ही आगळीवेगळी रचना त्यांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा मनापासून केलेला आविष्कार होता. प्रतीकात्मक उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावनिक निरोप दिला आणि एकता, प्रेम व परंपरेचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शरद मैंद, सचिव श्री सुरज डुबेवार, उपाध्यक्ष श्री संतोष अग्रवाल, कोषाध्यक्ष श्री मनिष अनंतवार,सहसचिव श्री संगमनाथ सोमावार, प्राचार्या डी. राधा, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले.