तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत वालतुर तांबडे येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेचे घवघवीत यश.!

पुसद : येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणातील मैदानावर तालुका स्तरीय शालेय क्रीडा अंडर १४वयोगटातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या तालुका स्तरीय स्पर्धेत तालुक्यातील वालतुर तांबडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेने समभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले.
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दिलेली माहिती अशी की.दि३० सप्टेंबर २०२५ रोजी पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणातील मैदानावर तालुका स्तरीय शालेय क्रीडा अंडर १४ वयोगटातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील वालतुर तांबडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेने समभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले.
या घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये चाहत जाधव प्रथम आला तर २००मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये कु.आराध्या गव्हाळे प्रथम, तर कु.योगिता कळंबे द्वितीय
६००मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये कु.श्रुती हमाने द्वितीय तसेच लांब उडी मारणे या क्रीडा प्रकारामध्ये कु.दिव्या राठोड प्रथम आणि उंच उडी मारणे या क्रीडा प्रकारामध्ये कु.आराध्या गव्हाळे प्रथम,हर्डल्स या क्रीडा प्रकारामध्ये चाहत जाधव प्रथम, कु.आराध्या गव्हाळे द्वितीय, तसेच ४×१००मीटर रिले या क्रीडा प्रकारामध्ये चाहत जाधव,कु. योगिता कळंबे, कुं.दिव्या राठोड, कु.आराध्या गव्हाळे,कु. श्रुती हमाने हे प्रथम क्रमांकाने विजयी झाले. पुढे होणाऱ्या जिल्ह्याला स्तरिय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी चोंढी केंद्राचे केंद्रप्रमुख जाधव सर, शाळेचे मुख्याध्यापक मधुकर मोरझडे सर, भारत राठोड सर, जयसिंग चव्हाण सर, प्रफुल्ल पांडे सर, विकास वाकडे सर, रोहिदास पवार सर, श्रीराम आढाव सर, संभाजी हंगरगे सर, संतोष भाऊ तांबारे, आलासिंग बापू,दिलीप भाऊ जाधव, सदानंद भाऊ राठोड, केवल भाऊ भिसे, विक्रम राठोड सर व शाळा व्यवस्थापन समिती व समस्त गावकरी मंडळींनी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले व पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या...