‘वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे’

पुसद:हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी १८ ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांचा तसेच कृषी शास्त्रज्ञांचा शाल, श्रीफळ, स्मृतिमानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याची पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानची दीर्घ परंपरा आहे. कृषी पुरस्कार निवड प्रक्रियेमध्ये वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव संपूर्ण महाराष्ट्रातून बोलविण्यात येत आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश व कोकण अशा विभागातून विभागनिहाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन आणि अधिक नफा प्राप्त केला असल्यास आपला जीवनालेख (बायोडाटा) पाठवावा. त्यामध्ये खर्च किती, उत्पादन (टनामध्ये) किती व बाजारपेठेत विक्री केल्यानंतर किती निव्वळ नफा झाला याची सविस्तर माहिती द्यावी. तसेच या वर्षी शास्त्रज्ञांसाठी औषधी व सुगंधी वनस्पतीवर विशेष कार्य करण्याबद्दल हा विषय निवडला आहे ज्यांनी औषधी व सुगंधी वनस्पतीवर विशेष संशोधनात्मक कार्य केलेले आहे अशाच शास्त्रज्ञांनी त्यांचा जीवनालेख (बायोडाटा) आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा.तर शेतकऱ्यांनी कृषीविषयक आणि कृषी संलग्नित क्षेत्रामध्ये केलेल्या विशेष कार्याबद्दल पुरस्कार – वरील विषयावर कार्य करणाऱ्या शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी सामुहिक शेती यांनी देखील सविस्तर माहितीसह प्रस्ताव पाठवावे.वरील सर्वांनी आपले प्रस्ताव दोन पासपोर्ट फोटोसह दि.१०जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.
पत्रव्यवहाराचा पत्ता:-
कृषिभूषण दीपक आसेगावकर, अध्यक्ष, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयासमोर पुसद- ४४५२०४ , जि. यवतमाळ
दीपक आसेगावकर- ९९२२५५२२२२
प्रा. गोविंद फुके९८२२४६६९०२
प्रा.अप्पाराव चिरडे ९४०४२३६२३६
उत्तमराव जाधव- ७५८८०४३०३६



