सोशल मीडियावरून आदिवासी समाजा बद्दल गरळ ओकणाऱ्या समाजकंटका विरूद्ध तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करून अटक कारा!-सामाजिक कार्यकर्त्या सौ.वर्षाताई माधवराव वैद्य,

पुसद : शहर पोलिस ठाण्यात थेट सामाजिक कार्यकर्त्या सौ.वर्षाताई माधवराव वैद्य यांच्या नेतृत्वात धडकल्या आदिवासी समाजा बाबत नुकतेच काही समाजकंटकांनी धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होईल, अशा हेतूने समाज माध्यमावर आदिवासी समाजाच्या महिला बाबत अश्लील भाषेत वक्तव्य ‘पोस्ट’ प्रसारित केल्यामुळे संबंधित समाजकंटका विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी या महिलांच्या वतीने आज करण्यात आली आहे. जर प्रशासनाने २४ तासाच्या आत गुन्हे न दाखल केल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.राज्यातील विविध समाजाकडून आरक्षणाच्या मागण्या काही थांबताना दिसत नाहीत.एकापाठोपाठ एक सर्वजण आरक्षणाचा अट्टाहास धरताना दिसत आहेत.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा शासन आदेश काढल्यानंतर ओबीसी समाजात नाराजी निर्माण झाली आहे तर राज्यात सध्या आरक्षणाच्या मागण्यांचे सत्र सुरू आहे. राज्यातील प्रत्येक समाज हा आरक्षणाची मागणी करतो की काय? असे चित्र निर्माण झाले आहे.
यातच भर म्हणून बंजारा समाजानेही हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. धनगर समाजाला ही एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी आहे. या मागणीत आता आणखी एक भर पडली आहे. बंजारा आणि धनगर समाजाच्या पाठोपाठ आता वंजारी समाजाने देखील एसटी मधून आरक्षणाची मागणी केली आहे.एकीकडे संविधानीक पदावर बसलेले आमदार मंत्री सुद्धा मतांवर डोळा ठेवून अशा असंविधानीक मागणीला बळ देत असल्यामुळे राज्यातील आदिवासी समाज भयभीत झाला आहे.याच अनुषंगाने काही समाजकंटकांनी गावा गावातील जाती जातीमध्ये धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य अथवा ‘पोस्ट’ प्रसारित करण्याचे प्रमाण वाढले आहे.नुकतंच सोशल मीडियावरून आदिवासी समाजाच्या महिला बाबत काही समाजकंटकानी समाज माध्यमावर गरळ ओकल्याने आदिवासी समाजातील महिलांच्या व आदिवासींच्या भावना दु: खावल्याने या समाजाकंटकाविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या सौ.वर्षा माधव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली महीलांनी थेट पुसद शहर पोलिस ठाण्यात धडक देऊन केली आहे तसेच पोलीसांना निवेदन दिले आहे. आदीवास समाज व आदिवासी समाजांतील महीला बदल गरळ ओकणाऱ्या विरूद्ध २४तासाच्या आत ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार कारवाई करुन त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.जर पोलिसांनी आदिवासी समाजातील महिला बाबत सोशल मीडियावर गरळ ओकणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई केली नाही तर ह्या आदिवासी महिला लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलतांना या आदिवासी महिलांनी दिली आहे. यावेळी शहर पोलिस ठाण्यात आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षाताई माधव वैद्य,सौ. मिरा मोती बोडखे,सौ. आरतीताई फुपाटे, श्रीमती आशाताई पांडे, सौ. शितल ढगे,सौ.सुनिता कोठुळे,सौ. कांता वायकुळे,सौ. मीनाक्षी चांदोडे, शितल कराळे,सौ. छाया पांडे, सौ.सपना लांबटोंगळे,सौ. सुलोचना लांबटोंगळे, कीरण हगळे, मनिषा दुमारे, संतोषी पिंपळे, सुनिता जंगले,सौ.मंजुशा बोंबले,राधा हजारे, सुनिता मळघने, शकुंतला इंगळे, अर्चना उगले,अशा भिसे अदि विविध संघटनेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यां व सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीत होते.