जिल्हा परिषद यवतमाळ व पुसद पंचायत समितीच्यावतीने ग्रामपंचायत वालतूर तांबडे, चोडी, बांशी येथे राबविले ‘स्वच्छता ही सेवा अभियान!

पुसद : तालुक्यातील वालतुर तांबडे येथे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत “एक झाड आईच्या नावे”घरकुल तेथे शोष खड्डा एक सात एक तास श्रमदान अभियान दि.२५सप्टेंबर रोजी राबविण्यात आले. या अभियानासाठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित करण्यात आली होती.
जिल्ह्यात या अभियानास लोकचळवळ निर्माण व्हावी या हेतूने जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी संयुक्तरित्या या अभियानाचे आयोजन अति अभियान संचालक शेखर रौंदळ पाणी व स्वच्छता मिशन महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्वच्छता अभियान ही प्रत्येकाची जबाबदारी असून यात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग महत्त्वाचा आहे. वालतू तांबडे हे गाव स्वच्छतेचा आदर्शवत अग्रदूत असून या गावातील स्वच्छतेचे अनुकरण इतर गावांनीही करावे त्याचाच एक भाग म्हणून एक तास स्वच्छतेसाठी आरोग्यदायी जीवन आणि गावाचा विकास साधायचा असेल तर त्याचे मूळ स्वच्छता आहे. आपल्या घरासोबतच आपला परिसर व आपले गाव स्वच्छ राहिल यादृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येवून इतरांनाही प्रेरणा मिळेल असे काम केले पाहिजे. आपली संस्कृतीही आपल्याला स्वच्छतेची शिकवण देते. या गावातील स्वच्छता हि कौतुकास्पद आहे परंतु गावकऱ्यांनी भविष्यातही हे सातत्य सदैव ठेवणे गरजेचे आहे.
यासाठी गावातून स्वच्छतेसाठी फेरीचे आयोजन करून जनजागृती केली तर गावाची प्रगती होऊ शकते असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.या अभियानाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर, पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, सहा.गटविकास अधिकारी संजय राठोड, राज्य समन्वयक आशिष थोरात, जिल्हा समन्वयक भारत चव्हाण, महेंद्र गुल्हाने, प्रफुल शहाडे , विस्तार अधिकारी डाखोरे,वाघमारे, बोजेवार,शेख , पिंपळे समूह समन्वयक रामेश्वर जाधव व टीम तसेच वालतूर तांबडे, चौंडी , बांशी ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव कु.प्रियांका इंगोले,उपसरपंच सौ.निकिता सदानंद राठोड,चोंढी सरपंच पांडे मॅडम ग्रामपंचायत अधिकारी विजय इसळकर, जयवंत साखरे,पी आर आडे तसेच गावातील पोलिस पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सर्व शिक्षक वृंद,सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी,सर्व विद्यार्थी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.