Uncategorized

झटका मशीनच्या झटक्याने वन्य प्राण्यांपासून वाचवा पिकांना! महाडीबीटी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव

पुसद: राज्यात सर्वाधिक जंगल व्याप्त क्षेत्र म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख असूनहा जिल्हा दोन अभयारण्यांनी वेढला गेला असुन या अभयारण्यात वाघ , रोही , हरीण , बिबट , रानडुक्कर या जंगली प्राण्यांचा मुक्त संचार आहे. या भागातील शेतकरी वन्यजीवांचा त्रासाला सातत्याने कंटाळले असून शेतकऱ्यांमध्ये व वन्यजीव प्राण्यात सातत्याने संघर्ष सुरू असतो वन्य जीवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होते शेतकऱ्यांना रात्रीजागल करून आपल्या पिकाचं संरक्षण करावं लागतं अनेकदा वन्यजीवाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना जीव देखील गमवावा लागतो त्यामुळे पिकांचेही मोठं नुकसान सहन करावी लागत असून हे नुकसान लाखो रुपयात असतं आणि मिळणारी मदत हजारात असते म्हणून होणारे पीक नुकसान टाळता यावी यावर पर्यायी व्यवस्था म्हणून वनविभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दुरवस्था लक्षात घेता राज्य शासन वन विभागाच्या शासन निर्णयाने महाडीबीटी च्या माध्यमातून सोलर झटका मशीन शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर दिल्या जात आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय काळी दौलत खान वतीने शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन वाटप कार्यक्रमात केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बी एन स्वामी उपवनसंरक्षक तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी नेते मनीष भाऊ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून वृक्षाचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सौ. निशा संतोष राठोड, सरपंच काळी दौ,उज्वल रणवीर तंटामुक्त अध्यक्ष उखंडा राठोड , प्रकाश दवणे पोलीस पाटील विश्वनाथ कलाने वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष माळकिनी आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला प्रस्ताविक करून सम्राट मेश्राम वनपरिक्षेत्र अधिकारी काळी दौलत खान यांनी वन विभागाच्या विविध या योजनेबद्दल विस्तृत माहिती दिली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ७५ लाभार्थी शेतकऱ्यांना कुंपण साहित्याचा वाटप करण्यात आला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन वनविभागाच्या माध्यमातून डॉ. बी. एन. स्वामी उपवनसंरक्षक यांनी केले यावेळी वनविभागाचे एस.जी .नरोड संवस पुसद वन विभाग, बदकुले साहेब, केंद्रे साहेब वनरक्षक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी मोरे यांनी केले तर आभार श्रीमती नंदा कदम वनरक्षक यांनी मांडले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थिती होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close