भव्यदिव्य पक्ष प्रवेश सोहळा आमदार विजयजी वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत संपन्न!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : वणी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने दि. १६ जुलै ला राज्याचे माजी. कॅबिनेट मंत्री,आमदार मा.विजयजी वडेट्टीवार व माजी आमदार मा.वामनरावजी कासावार यांच्या प्रमुख उपस्थिती शेतकरी मंदिर येथे भव्य काँग्रेस प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील असंख्य युवकांनी तसेच विरकुंड येथील असंख्य ग्रामस्थांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
नवनियुक्त कार्यकारी तालुका अध्यक्ष व कार्यकारी शहर अध्यक्ष घनशामजी पावडे व मालेकार सर यांचा सत्कार करण्यात आला तसेच M.P.S.C स्पर्धा परीक्षतील P.S.I पदी नियुक्त झालेल्या विद्यार्थ्याचा गौरव चिन्ह देउन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवानीताई वडेट्टीवार, देवतळे साहेब, नरेंद्र पाटील ठाकरे, डॉ. महेंद्रजी लोढा, आशीषजी खुलसंगे, मोरेश्वरजी पावडे, राजीवजी कासावार, राजु भाऊ येलटिवार, राकेशजी खुराणा, ईजहारभाई शेख, प्रमोद निकुरे, ओम भाऊ ठाकुर, डेनी भाऊ संड्रावार, राहुल दांडेकर, उत्तमजी गेडाम, संध्याताई बोबडे, काजलताई शेख, सविता ताई ठेपाले, शालिनी ताई रासेकर,अशोक नागभिडकर व असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.