उद्गगम फाउंडेशनच्या वतीने शाळेतील गरजू मुलींना मोफत ड्रेसचे वाटप!

पुसद :आज दि,१८ ऑगस्ट२०२४ रोजी न. प. हिंदी हायस्कूल येथे मध्ये हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्व वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त व रक्षाबंधन निमित्त शालेय अर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थीना मोफत ड्रेस वाटप करण्यात आले.. मान्यवरांच्या हस्ते कै. वसंतरावजी नाईक व विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती मातेचे पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.आकांक्षा निशांत बयास होत्या..प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण तज्ञ दिग्रस अल्फा रोकडे मॅडम उद्गगम फाउंडेशनच्या सचिव सौ.सोनलताई ययाती नाईक प्रमूख पाहुणे सुनंदा दमकोंडावार ,साहिती ययाती नाईक , पानेकर मॅडम , अनिल जाधव सर ,देशोनतीचे पत्रकार दीपक महाडिक हे होते.. सामाजिक कार्यासाठी शांतीसागर इंगोले व मोनिका गजानन जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभा चापके ,किरण राठोड ,मिनाक्षी व्यवहारे , सुनीता भोयर ,शामल गुध्दटवार ,रंजना कदम ,माशीरा सबा ,पायल आडे ,श्रुती पाटील ,सुधा देशमुख ,मंजुषा देशमुख ,कविता शिंदे ,ज्योती मगर ,सुरेखा कदम ,मनीषा वराडे ,प्रांजली भोयर ,अनुश्री पुरी ,वर्षा जाधव ,शुभांगी पिंजरकर ,सुनील जाधव ,मंडलिक सर व इतर मान्यवर आणि सहकारी उपस्थित होते…याप्रसंगी उद्गगम फाउंडेशनच्या सचिव सौ सोनलताई नाईक यांनी फाउंडेशन हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणकोणत्या प्रकारे कामे करीत आहे या विषयावर विस्तृत अशी माहिती दिली. आणि महिला सुरक्षितेसाठी काम करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अल्फा रोकडे मॅडम यांनी फाउंडेशनच्या कार्याचा गुणगौरव करून आज महिला साठी कार्य करणे हि काळाची गरज बनत चालली आहे असे सांगितले..याप्रसंगी पालिका शाळा क्र १ हिंदी शाळा क्र १ व २ व लोकशाहिर अण्णा भाऊ साठे शाळा क्र ४ पापालाल जैस्वाल मराठी हायस्कूल व हिंदी हायस्कूल पुसद नगरपालिका शाळा क्र २ कन्या शाळा क्र २ ,नगर पालिका शालाक्रं ८ व जि प श्रीरामपूर शाला शालेय विद्यार्थ्यांना मोफत ड्रेस वाटप करण्यात आले..कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. डी डाखोरे व सुत्रसंचालन प्रविण कांबळे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री सुनील गुध्दटवार यांनी केले..