क्राइम

मोठी बातमी!उपविभागिय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाकडून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या तस्करावर धाड; १९ लाख ६५ हजारांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

पुसद:राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ तसेच गुटखा याबरोबरच सुगंधी किंवा मिश्रित सुपारी, पान मसाला प्रतिबंधीत असूनही राजरोस उपलब्ध होणाऱ्या गुटख्यावर शहरात पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. गोपीने माहितीवरून पुसद पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरुन त्यांच्या पथकाने शहरातील धनकेश्वर नगर मोमीनपुरा येथे उतरणारा अवैध गुटख्याच्या मुद्देमालासह तस्करावर ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन गुटखा तस्कराला अटक करण्यात आली असून त्याच्या बोलेरो मॅक्स पिकअप वाहनात दडवून ठेवलेल्या सुमारे ६ लाख ६५ हजार ३४८ हजारांच्या गुटख्यासह १९ लाख ६५ हजार ३४८रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की,पुसद शहरात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपीने माहितीवरून दि. ३ जानेवारी २०२५ रोजी अवैध गुटख्याचा माल दोन वाहनांमध्ये भरून धनकेश्वर नगर, मोमीनपुरा, पुसद येथे येणार आहे अशी माहिती मिळाली होती त्या आधारे उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या पथकाला सदर गुटखा वाहतूक वाहनाची तपासणी करणे करीता पाठविले तेव्हा मोमीनपूरा पुसद कडे दोन चारचाकी वाहने येतांना दिसली त्यामधील मालवाहू बोलेरो मॅक्स पिकअप वाहन कमांक एम.एच.२६ सी.एच. ०२६४ हे वाहन चालक आरोपी नामे (१) जमीर खान अजब खान, वय ३८ वर्षे, रा. सुदर्शन नगर, पुसद हा होता तर दुसरे वाहन चारचाकी बोलेरो वाहन क्रमांक एम.एच २९ आर २७१० हे वाहन आरोपी नामे (२) मोहम्मद मुद्दसीर अब्दुल कदीर, वय २९ वर्षे, रा. सुदर्शन नगर, पुसद हे चालक होते. तेव्हा सदर दोन्ही वाहनांना थांबवून रस्त्याच्या बाजुला लावण्यास सांगून दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, त्या दोन्ही वाहनांमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक शासनाकडे प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखु व पानमसाला गुटख्याचा साठा अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला. सदर दोन्ही आरोपीचे ताब्यातील वाहनामध्ये भरलेला गुटख्याचा माल ६,४५,३४८/- रूपयाचा व मालवाहू बोलेरो मॅक्स पिकअप वाहन किंमत अंदाजे ८,०००००/- रूपये व बोलेरो वाहन किंमत अंदाजे ५,०००००/- रूपये व दोन्ही चालकांकडील जप्त केलेले ०२ मोबाईल किंमत अंदाजे २०,०००/- असा एकुण १९,६५,३४८/- रूपयाचा मुद्येमाल घटनास्थळी जप्त केला.सदर अवैध गुटक्यावरची कारवाई कुमार चिंता, मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिग.जे. यांच्या अधिनस्त पथकातील पोहवा/सुनिल मदने, अभिजीत सांगळे, पोना/निलेश आहे, पोअं/संदिप चव्हाण, प्रतिक मिश्रा, गजानन जाधव, नरेश नरवाडे असे अंमलदार यांनी केली आहे. अवैधरित्या गुटखा विकी व वाहतूक होत असल्यास नागरीकांनी निर्भयपणे पोलीस विभागास माहिती कळवावी असे नागरीकांना आवाहन पोलिसाच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close