पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार देण्याचे टाळणाऱ्या सरपंच व सचिवावर कारवाईची मागणी!

महागाव/प्रतिनिधी:फुलसावंगी येथील ग्रामपंचायत ने ३१ मे रोजी दोन कर्तृत्ववान महिलांना देण्यात येणारा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिलाच नव्हता. पुरस्कार वाटपाचा कार्यक्रम आपल्या सोयीने टाळणाऱ्या सरपंच व सचिवा वर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्या कडे केली आहे.
३१ मे रोजी महीला व बाल कल्याण विभागा मार्फत गावातील समाजासाठी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांना निवडूण त्यांना ३१ मे रोजीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून सन्मानीत करण्याचे आदेश तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींना देण्यात आले होते व त्याची रीतसर अंमलबजावणी गाव पातळीवर करायची असे आदेश सुद्धा सर्व सचिवांना देण्यात आले होते व हे राज्य सरकारचे निर्देश होते. मात्र महागाव तालुक्यातील फुलसावंगी ग्राम पंचायतने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाला बगल देवून हा समाजउपयोगी कार्यक्रम केलाच नाही. त्यामुळे गावातील प्रतिष्ठीत नागरीक समाज बांधवामध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. तसेच हा पुरस्कार सोहळा पुर्ण करण्यासाठी व प्राप्त झालेल्या अर्जा पैकी दोन अर्ज निवडण्यासाठी समीती स्थापन करावयाची होती.परंतु ग्राम पंचायतने अशी कोणतीच प्रक्रीया राबविली नसल्याने गावातील कर्तबगार महिला या पुरस्कारा पासून वंचीत राहिल्या असल्यामुळे संबंधीत सरपंच,सचिवावर शिस्त भंगाची कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे.अन्यथा आम्ही गावकरी याविरोधात उपोषणास बसु अशा आशयाचे निवेदन महागाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांना देण्यात आले
यावेळी अमरदिप दळवे,अजय देशपांडे,
योगेश बाजपेयी,रविन्द्र पांढरे,डॉ.गजानन वैद्य,भगवान नाईक,समशेर खान,शंकर वैद्य,किरण चटने,शशिकांत नाईक,विजय पाटील,राघो बोक्से,किरण शेळके,सुभाष लिमजे,राजू देवतरासे,याकुब खान,विश्वास वैद्य,दिपक चटने यांनी दिला.