ईतर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभाग घेतलेल्या बांन्शी ग्रामपंचायतीला भारत गणेशपुरे यांची भेट देऊन गावांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण!

पुसद : पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील बांन्शी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत भाग घेतला असून या ग्रामपंचायतीने अभियानांतर्गत केलेल्या कामांची पाहणी करुन ग्रामपंचायतीना प्रोत्साहन देणे, ग्राम विकासाला चालना मिळावी व अभियानाची अधिक प्रचार प्रसिद्धी व्हावी यासाठी ग्रामस्थांचा उत्साह वाढविणे या उद्देशाने ६ मार्च२०२६ रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेता भारत गणेशपुरे हे अभियानात सहभागी झाले होते व या गावांतील ग्रामस्थांना भेट देऊन गावांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले आणि ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली असून ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे.याच अनुषंगाने पुसद तालुक्यातील बांन्शी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सहभागी झाली आहे.

दि६ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याच्या अनुषंगाने आदर्श ग्रामपंचायत बान्सी येथे प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी भेट दिली व गावामधील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले त्यामध्ये “सुंदर माझ गावं बान्सी” ,पीएमश्री जिल्हा परिषद प्राथ शाळा येथील ‘बालवाटीका’ याचाही लोकार्पण केला, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान यासाठी आलेल्या देणगी मधून स्मशाभूमीमध्ये बसण्यासाठी शेड बांधकामाचे भूमिपूजन व वृक्षारोपण करण्यात आले गावातील दीव्यांग लाभार्थ्यांना ब्लँकेट वाटप, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, महिला बचत गटांना निधी वाटप, महिलांना ओला व सुका कचरा याच्या कुंड्याचे वाटप करण्यात आले.

अभिनेता भारत गणेशपुरे यांनी या अभियानातून केलेल्या सर्व कामाची पाहणी केली या अभियानामध्ये ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे कौतुक केले नागरिकांनी नेहमी गावाच्या विकासासाठी जात धर्म पंथ विसरून सर्वांनी एकत्र यावे असे यावेळी आवाहन करण्यात आले.प्रथम नागरिक सरपंच गजानन टाले यांनी आपल्या प्रास्ताविकातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावात केलेली विकासकामांची माहिती दिली..

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहेत्रे साहेब जिल्हा परिषद यवतमाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड,सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड, विस्तार अधिकारी शेख साहेब, डाखोरे साहेब, पिंपळे साहेब, ग्रामपंचायतीचे सचिव प्रेमजित आडे,डीएनए-१३६ संघटनेचे सर्व कर्मचारी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व विवीध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बांन्शी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत  करण्यात आलेली विकासकामे!

 

१) गावांमध्ये विविध ठिकाणी CCTV , कॅमेरे आणि गावांत रंगरंगोटी ..

२) शासकीय इमारतीवर पाऊस पाणी संकलन …

३) आपले सरकार सेवा केंद्र सुरू..

४) प्रधानमंत्री आवास योजना मध्ये ३०२ घरकूल मंजूर..

५) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे CCTV, कॅमेरे व परसबाग, डिजिटल शाळा, पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालयाची पुरेशी व्यवस्था, प्रशस्त वर्गखोल्या…

६) गावांमध्ये शोषखड्डे निर्माण केले..

७) गावातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी अनेक शेतीमध्ये जलतारे करण्यात आले ..

८) गावं जलसमृद्ध बनविण्यासाठी गावातील तलावातील गाळ काढणे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, नविन सिमेंट बंधारे बांधण्यात आले …

९) गावात अनेक प्रकारचे वृक्ष व फळबाग लागवड करण्यात आली ..

१०) पांदन रस्ते व अंतर्गत रस्त्याची नविन कामे व दुरूस्ती करण्यात आली…

११) अनेक निराधार नागरीकांना तहसील मार्फत योजनेचा लाभ मिळून देण्यांत आला..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close