श्रीरामपूर येथे पोळा सण मोठ्या थाटात साजरा!

पुसद:या धावपळीच्या जीवनामध्ये आपली संस्कृती लोक पावत चालली आहे ती संस्कृती जपल्या गेली पाहिजे पुसद शहराला लागूनच असलेले ग्रामपंचायत श्रीरामपूर ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे व या ग्रामपंचायतचे शहरीकरण झाले आहे. तरीसुद्धा आपला वसा जपण्याकरिता ग्रामपंचायत श्रीरामपूर पुढाकार घेऊन फार भव्य प्रमाणात बैलपोळा हा सण साजरा केला व यामध्ये माजी वसुंधरा ४.० अंतर्गत पर्यावरण महत्व व झाडे लावण्याची शपथ घेण्यात आली.
तसेच श्रीरामपूर ग्रामपंचायत तर्फे बैल जोडी सजावट व उत्कृष्ट वागणूक यावर बक्षीस देण्यात आले. प्रथम पारितोषिक ३००१रुपये, द्वितीय पारितोषिक २००१₹, तृतीय पारितोषिक १५००१रुपये,चतुर्थ पारितोषिक १०००१रुपये, विशेष पारितोषिक सातशे एक रुपये सरपंच श्रीरामपूर आशिष काळबांडे यांच्यातर्फे देण्यात आले.
जोड्या निवडण्याचे निरीक्षक पंच म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष विजय वडते, साहेबराव गुजर सर, हिरामण माहुरे सर, हे होते. या बैलजोडी सजावट मध्ये 25 जोड्यांना सहभाग नोंदविला याकरिता ययातीभाऊ नाईक उपाध्यक्ष पिंपळगाव सूतगिरणी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यवतमाळ यांच्यातर्फे प्रोत्साहन पर प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक उत्तम जाधव यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये सरपंच आशिष काळबांडे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये विजय राठोड, मिलिंद उदयपूरकर, राहुल सहारे,दिनेश राठोड, हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्यांनी आपला सिंहाचा वाटा दिलाअसे प्रमोद कदम, मधुकर कलिंदर, अमोल पवार व ग्रामपंचायतचे सचिव अनिल भगत ग्रामपंचायतीचे कर्मचारी वर्ग व गावातील मंडळी सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले हा कार्यक्रम एकोपा व गावची संस्कृती जपणारा नवीन पिढीला पोळा सण हा कसा असतो. हा समजावून सांगणारा ठरला. त्यामुळे या सणाला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते. पर्यावरण पूरक सण साजरा करण्यात आला यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.