ईतर

मनसेच्या आंदोलना पुढे वे.को.लि.प्रशासन नमले, विद्यार्थांना मिळाली बस !

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : तालुक्यातील निळापुर, ब्राह्मणी, कोल्हार,पिंपरी व बोरगाव यागावाला वेकोलीच्या वाहतुकीने मोठा अडथळा निर्माण होत होता. याच बरोबर या दत्तक गावांना वेकोली कडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली बस सुध्दा बंद करण्यात आली.यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने येथील विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी मनसे नेते राजु उंबरकर यांची भेट घेतली व येथील शाळकरी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली बस पुन्हा चालू करण्यात यावी. अशी मागणी केली. कोलार खुल्या खदानी अंतर्गत निळापुर, ब्राह्मणी, कोल्हार,पिंपरी व बोरगाव ही गावे दत्तक आहेत. त्यामुळे या गावांतील विकासाची कामे करण्याचे व इतर सुविधा देण्याचे काम हे वेकोली प्रशासनाचे आहे. त्यामुळे गावांतील शाळकरी विद्यार्थ्याना ये – जा करण्यासाठी एक बस देण्यात आल्या होती. परंतू काही दिवसापूर्वी ही बस बंद केली. तर ती बस शाळकरी विद्यार्थ्यांसाठी नसून इतर वाहतुकीसाठी आहे असे सांगून हे ही बस बंद करण्यात आली होती. सदर सर्व विद्यार्थी हे वणी येथे शिक्षण घेतात तर या विद्यार्थ्यांची संख्या एका बसच्या क्षमते पेक्षा जास्त होती. त्यामुळे या सर्व विद्यार्थांना या बस वाहतुकीचा लाभ मिळत नव्हता, परिणामी त्यांना खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागत होता. परंतु या मार्गावर वेकोलीची असलेली वाहतूक ही खाजगी वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी असल्याने खाजगी वाहतूकही या मार्गावर अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विद्यार्थ्याना या बसचा लाभ मिळावा याकरिता येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांची स्थानिक जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन वेकोली कडून होत असलेली ही मनमानी थांबून आमच्या विद्यार्थ्यांकरिता नियमित स्वरूपाच्या दोन बसेस चालू करून द्यावे अशी मागणी केली. ग्रामस्थांच्या या मागणीस उंबरकर यांच्याकडून तात्काळ प्रतिसाद देत. मनसे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार व सहकाऱ्यांना हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. पक्ष आदेशाप्रमाणे पदाधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांसहित ब्राह्मणी येथे काल ( दिनांक ०३/१०/२०२३ ) रोजी मोठया प्रमाणात रास्तारोको आंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनाकडून सकाळी ०९.०० ते रात्री ०८.०० पर्यंत वेकोलीची सर्व वाहतूक थांबून आपल्या मागणीला जोर लावून धरला. पूर्वी वेकोली प्रशासनाकडून चालू असलेल्या दोन्ही बस पूर्ववत करून विद्यार्थ्यांकरीता या बसेस चालू करून देण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संबंधित गावकऱ्यांकडून करण्यात आलेले या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अखेरीस रात्री उशिरा संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनास भेट देऊन, आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या. व सद्यस्थितीत एक बस चालु करुन पुढील दहा दिवसात दुसरी बस चालु करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. व एक बस तात्काळ चालु झालमनसेच्या आक्रमक पावित्र्यामुळे वेकोलीचे मुजोर प्रशासन नमले व विद्यार्थ्यांना बस मिळाली या मुळे उपस्थित सर्व गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी राजु उंबरकर यांचे आभार मानले. यावेळी या आंदोलनात तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, लक्की सोमकुंवर, राजू काळे,गोवर्धन पिदुरकर,सूरज काकडे,शिरीष भावरे,प्रविण कळसकर , अनंता डाखरे, योगेश काळे,जयश्री उपरे,विद्या शेंडे,अमृता बांगडे,शोभा चामाटे, पोर्णिमा खामनकर,छबूताई खामनकर,सविता मत्ते,अर्चना डाखरे यांच्या सह स्थानिक पदाधिकारी व या गावांतील सर्व गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close