बेधडक कारवाई! पुसद शहरात आयकर विभागाची धाड ; एका प्रायव्हेट कंपनीच्या संचालकच्या कार्यालयासह प्रतिष्ठानची एकाचवेळी तपासणी!

पुसद : शहरांतील आशिष बजाज मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुसदच्या कार्यालयासह प्रतिष्ठानांवर एकाच वेळी नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. या आयकर विभागाच्या धाडीमुळे शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
याबाबत झेप न्युजला सूत्राने दिलेली माहिती अशी की, पुसद शहरातील आशिष बजाज मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुसद कार्यालय आसेगावकर ले-आउट मधील एका व्यापार संकुलात असून त्यांचे निवासस्थान कारला रोडवर आहे .आज मंगळवार सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळपास २० जणांच्या ताफ्याने आशिष बजाज मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुसदच्या कार्यालयासह प्रतिष्ठानांवर एकाच वेळी नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यासह पोलिसांनी धाड टाकली व झाडाझडती घेतली असून ही कारवाई तिन ते चार दिवस चालेल अशी संबंधित अधिकाऱी सूत्रांनी दिली आहे. परंतु आशिष बजाज मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत होणाऱ्या आर्थिक देवाण-घेवाण व इतर व्यवहारांचे झाडाझडती सर्वेक्षण होणार आसल्याची प्राथमिक माहिती आहे. या आयकर विभागाच्या धाडीत कार्यालयातून व प्रतिष्ठानमधून काही रजिस्टर, नाेंदवह्या आणि कागदपत्रे ताब्यात घेतले असून या साहित्याची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.तर काही राेख रक्कम व काही वस्तू आढळून आल्याचे बाेलल्या जात असले तरी त्याला अधिकृत दुजाेरा मिळू शकला नाही.या कंपनीच्या संचालकाच्या निवासस्थानी व कार्यालयात धाडीच्या झाडाझडती मोठे घबाड समाेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही सोबतच या प्रकरणाशी शहरातील काही इतर व्यापाऱ्यांचाही संबंध आहे कां, याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. या धाडीमुळे शहरातील व्यापारी वर्गात मात्र खळबळ उडाली आहे.