ईतर
ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला जोरदार धडक, अपघातात २५ प्रवासी जखमी

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील गौराळा फाट्या नजिक एका ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकला जबर धडक दिली.
अकोला येथील हमसफर ट्रॅव्हल्स (एम.एच.२७ ए.९९९४) आकोली, तेल्हारा येथील ५० भाविकांना घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे दर्शनासाठी जात होती. दि.२८ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजेदरम्यान गौराळा फाट्या जवळ उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सने मागुन जबर धडक दिली.
या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स मधील २५ ते ३० प्रवासी जखमी झाले असून जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर एका महिलेला कटरच्या सहाय्याने ट्रॅव्हल्स मधून रात्री उशिरा बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने या भीषण अपघातात जिवीतहानी झाली नसली तरी भाविकांची ट्रॅव्हल्स अपघातग्रस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.