पुसद शहरात महीलेच्या दुचाकीच्या डीकीतुन तिन लाखांच्यावर रोकड लंपास!

पुसद : शहरातील एका महिलेच्या दुचाकीच्या डिकीत ठेवलेली तीन लाखांच्यावर रोकड चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केली. त्या महिलेच्या मुलाची प्रकृती ठीक नसल्यामुळे उपचाराकरिता पुसद येथील युनियन बँकेमधून ‘एफडी’ तोडून पैसे काढून दुचाकीच्या डिकीत ठेवल्यानंतर, चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि अवघ्या २०ते३० मिनिटांत तब्बल ३ लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरट्यांनी युनियन बँकेपासूनच या महिलेवर पाळत ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.पण भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सौ.पुजा प्रतीक जगताप वय २६रा. वसंतनगर पुसद ता. पुसद जि.यवतमाळ,यांनी पुसद शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, शहर पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आज दि. ६ जुलै २०२६ रोजी या महिलेच्या मुलाची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी मुलाला डॉ.चिलकर यांच्या रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले होते त्यामुळे त्या मुलाच्या उफचाराकरिता पैशाची गरज असल्याने दुपारी १२;३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेने पुसद येथील युनियन बैंकेमधुन तिन लाख रुपयाची एफ.डी. मोडुन रक्कम काढली सदर रोख रक्कम त्या महिलेने ऑरेज व पाढ-या कलरच्या बॅगमध्ये ठेवून तसेच त्या बॅगमध्ये विओ कंपनिचा मोबाईल, बँकेचे चेक, अधार कार्ड, पॅन कार्ड बँकेची पासबुक असे सर्व कागदपत्रे त्यांनी बँकेच्या बाहेर येवून ती बॅग त्यांच्या दुचाकी ज्युपीटर गाडी क्रमाक एम एच २९,बिके०८३३ च्या डीकीमध्ये ठेवली आणि त्या तेथुन पाठक हॉस्पिटलच्या लॅबवर दुपारी०१/०० वाजता च्या सुमारास मुलाचा रिपोर्ट घेण्याकरीता गेल्या असता त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी ज्युपीटर गाडी लॅबसमोर उभी करून आतमध्ये रिपोर्ट घेण्याकरीता गेली व रिपोर्ट घेवुन थोड्याच वेळात परत आल्यावर त्या पुन्हा दुचाकीवर बसून शनि मंदीराजवळ आल्यावर त्यांना मैत्रीला फोन लावायचा असल्याने दुचाकीतून मोबाईल काढण्यासाठी दुचाकीची डिकी उघडली असता डीकीमध्ये ठेवलेली ऑरेज व पाढ-या कलरची बॅग गायब असल्याचे लक्षात आले त्यावेळी त्यांना धक्काच बसला त्यानंतर लगेच त्या परत पाठक हॉस्पिटलकडे जावुन बॅगचा शोध घेतला परतु त्या ठीकाणी बॅग मिळून आली नाही. तेव्हा त्यांना लक्षात आले की त्यांच्या गाडीच्या डीकीत ठेवलेल्या बॅगमधिल तीन लाख रुपये विओ कंपनिचा मोबाईल त्यात आयडीया कंपनिचे सीम असा ऐवज असलेला किमत अदाजे १००००/- रुपये, बँकेचे चेक, अधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेची पासबुक कोणीतरी अज्ञातांनी गाडीच्या डिकीमधुन एकूण ३१००००/- रुपयेचा माल लंपास केला असावा त्यावेळी त्यांनी तात्काळ भावासोबत या घटनेची माहिती पुसद शहर ठाण्यात जाऊन पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिसांनी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून शहर पोलीस ठाणे अवघ्या काही हाकेच्या अंतरावर आहे तरी देखील चोरट्यांनी दूचाकीच्या डीकीतील रोकड रक्कम लांबविल्याने पोलिसांची पुसद शहरात वचक संपुष्टात आली की काय..? अशी चर्चा होऊ लागली आहे.



